अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा दिसणार मराठीत

0

मुंबई : उर्मिला मातोंडकर हे नाव बॉलीवूडमधील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते आहे. अन्य अभिनेत्रींप्रमाणे उर्मिलानेही लग्नानंतर अगदी निवडक रोल स्वीकारले होते. या वर्षाच्या सुरुवातीला तिने अभिनय देवच्या “ब्लॅकमेल’मध्ये एका गाण्यापुरता परफॉर्मन्स दिला होता. यामध्ये इरफान खान आणि किर्ती कुल्हारी हे लीड रोलमध्ये होते. उर्मिला आता पतीदेव मोहसीन अख्तरबरोबर ती निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करते आहे. उर्मिलाने मराठी सिनेमाच्या निर्मितीत पाऊल टाकले आहे.

मराठी सिनेमांच कौतुक आता बॉलिवूडकरांनाही वाटू लागलं आहे. अनेक बॉलिवूड कलाकार मराठीत सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. कुणी मराठी सिनेमाची निर्मिती करतंय तर कुणी मराठी सिनेमांत काम करतंय. असं असताना आता उर्मिला लवकरच मराठीत दिसणार आहे. उर्मिलाच्या ‘माधुरी’ या चित्रपटाची पहिली झलक आता प्रसिध्द झाली आहे. यात दिसणारी माधुरी कोण आहे याचा उलगडा झालेला नाही. मात्र मराठीत एका सुंदर ‘माधुरी’ची या सिनेमातून एन्ट्री होणार आहे.

पण सिनेमाची कथा, उर्मिलाची भूमिका याबद्दलची उत्सुकता ताणून ठेवा. कारण ही माहिती अद्यापही गुलदस्तातच आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले असून हा सिनेमा 30 नोव्हेंबर 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

LEAVE A REPLY

*