उरीचा दमदार ट्रेलर रिलीज !

0
मुंबई – भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणार्‍या संबंधांवर परिणाम करणार्‍या एका महत्त्वाच्या घटनेला पुन्हा एकदा नव्या अंदाजात पाहता येणार आहे. ही घटना म्हणजे 29 सप्टेंबर 2016 मध्ये झालेला सर्जिकल स्ट्राईक. लाईन ऑफ कंट्रोल अर्थात एलओसीजवळ असणार्‍या पाकव्याप्त काश्मीर भागात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या घटनेवर आधारीत उरी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. उरीचा ट्रेलर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. विक्की कौशल आणि यामी गौतम यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. भारतीय सेनेद्वारे पाकिस्तान केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. विक्की कौशल उरीमध्ये एका भारतीय कमांडोची भूमिका साकारत आहे. तसेच यात किर्ती कुलहरी आणि परेश रावल यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

LEAVE A REPLY

*