‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वर ‘उरी’ पडला भारी

0
मुंबई : विकी कौशल स्‍टारर चित्रपट ‘उरी’ने बॉक्‍स ऑफिसवर कमाल दाखवत वीकेंडचा गल्‍ला भरून काढत आहे. चित्रपटात विकी कौशलसोबत यामी गौतमची मुख्‍य भूमिका आहे. दोघांच्‍याही अभिनयाला दाद देत प्रेक्षकांच्‍या पसंतीस ही जोडी उतरली आहे. विशेषकरून, विकी कौशलच्‍या अभिनयाचे भरभरून कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ८ कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केले. आठवड्‍यात उरीने ३५ कोटींची घसघशीत कमाई केली आहे.

२०१९ या नवीन वर्षामध्ये ‘उरी’ आणि ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. भारताच्या सूडाची कहाणी म्हणजेच ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपट होय. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपट म्हणजे ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’.

गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये चर्चा होती. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याची संधी मिळाली. मात्र या ‘उरी’ या चित्रपटाने तुफान कमाई करत ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ ला मागे टाकलं आहे.

 

 

LEAVE A REPLY

*