Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्रकल्पाला भीषण आग; पाच जणांचा मृत्यू, तीन जखमी

Share

मुंबई | प्रतिनिधी

उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्रकल्पाला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मृतांमध्ये दोन अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्लांटमध्ये आणखीही काही लोक अडकून पडल्याची भीती असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

अधिक माहिती अशी की, आज सकाळी सात वाजेच्या सुमारास उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्रकल्पाला आग लागल्याची महती मिळाली. आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते.

लिक्विड गळतीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागली तेव्हा रात्रीपाळीचे कामगार कामावर होते. आग लागल्यानंतर तिथं मोठा गोंधळ उडाला. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच अनेक कामगार जखमी झाले.

या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. आजूबाजूला असलेल्या वसाहतींमधील रहिवासी सुरक्षित स्थळी जाऊ लागले आहेत. आगीची माहिती मिळताच, ओएनजीसी, जेएनपीटी फायर ब्रिगेड, तसेच द्रोणागिरी, पनवेल आणि नेरुळ नेरूळ इथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत.  संततधार पावसामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अडथळे येत असल्याचे समजले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!