अप्पर जिल्हाधिकार्‍यांचा घरचा रस्ता बंद

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून अप्पर जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानाकडे जाणार्‍या मार्गावरील दरवाजा कुलूप लावून बंद करण्यात आल्याने त्यांना घरी जाताना इतर मार्गाचा शोध घ्यावा लागत आहे.
नगर महाविद्यालयाच्या बाजूने जिल्हाधिकारी निवासाकडे येणार्‍या मार्गावरून कार्यालयाकडे उठ-सुठ कोणीही येत असल्याने अखेर सदर दरवाजा बंद करण्याचे आदेश दिले. महाविद्यालयातील विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या मागे गैरवर्तन करत असल्याचे अनेकदा आढळून आले.
त्यांना हाकलण्याचाही प्रयत्न कर्मचार्‍यांकडून होत असे.मात्र, झाडा-झुडूपाच्या आडोशाला येऊन बसणार्‍यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत होती.अखेर ही बाब जिल्हाधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्य दरवाजाच कायमस्वरुपी कुलूपबंद करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय आपत्ती नियंत्रण कक्षही जवळ आहे.
त्याठिकाणी दिवसभर सेवेत असणार्‍या कर्मचार्‍यांचे नातेवाईक, सहकारी भेटण्यासाठी गर्दी करत.दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एका महिला अधिकार्‍यास लाच घेताना नियंत्रण कक्षात रंगेहाथ पकडण्यात आले होते.
अपर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवासस्थाने लगत आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांना दुपारी व सायंकाळी घरी जाताना जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानापासून आपल्या घराकडे जाण्यासाठी जवळ व संरक्षित रस्ता होता.

LEAVE A REPLY

*