Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : कुणालाही न सांगता घरातून गेलेल्या चारही मुली पुण्यात सापडल्या

Share

नाशिकरोड | प्रतिनिधी 

घरी कोणाला न सांगता पुण्याला फिरायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींनी पालकांची आणि पोलिसांची परिक्षाच पाहिली. नाशिकरोडच्या जयभवानीरोड परिसरातील या चारही अल्पवयीन मुलींना शोधण्यात उपनगर पोलिसांना यश आले आहे. तक्रार दाखल झाल्यापासून अल्पावधीतच पोलिसांनी त्यांचा यशस्वी शोध घेतला.

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी – जयभवानी रोड येथील या मुलींपैकी एक मुलगी तेरा, एक पंधरा तर दोघी चौदा वर्षाच्या आहेत. त्यांनी पुण्याला फिरायला जायचे ठरवले. एक मुलगी 23 आगस्टला सायंकाळी घरातून बाहेर पडली.

दोन मैत्रिणींसमवेत फर्नांडीसवाडी येथे जाते असे सांगून ती गेली. नंतर परतलीच नाही. खूप वेळ झाला, तरी मुलगी परत आली नाही. त्यानंतर घरच्यांनी शोध सुरु केला. परंतु कुठेही ठावठीकाणा लागला नाही. त्यामुळे पालकांनी आज दुपारी उपनगर पोलीस ठाणे गाठून मुली बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

त्याचवेळी अन्य तीन मुलींचे पालकही तेथे दाखल झाले होते. त्यांनीही आपल्या मुली बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यावरुन चौघी मुली सोबतच गेल्याचे स्पष्ट झाले.  उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांनी तपास सुरु केला. एका मुलीने मित्राला फोन केला होता. त्यावरुन या मुलीचा माग पोलिसांनी काढला. सर्व मुली पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समजले.

पोलिसांनी रेल्वे पोलिस तसेच बंडगार्डन पोलिसांशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. बंडगार्डन पोलिसांनी तातडीने शोध मोहिम राबवून या मुलींना यशस्वीरित्या शोधले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली.

अल्पावधीतच मुलींचा शोध लावल्याबद्दल सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष खडके, उपनिरीक्षक संतोष जगदाळे, इरफान शेख व सहकार्यांचे कौतुक होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!