आगामी निवडणुका जिंकणार : रामदास आठवले

0

पक्ष बळकटीकरणासाठी आरपीआय कडून शक्तीप्रदर्शन सुरु

अहमदनगर (प्रतिनिधी)- विरोधकांकडून सरकार विरोधी कट रचले जात आहे. परंतु मोदी सरकारकडून जनतेच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. यामुळे देशात सरकार विषयी सकारात्मक भूमिका पाहायला मिळते आहे. या शिवाय हे सरकार हे दलितांच्या हिताची भुमिका घेणारे सरकार आहे. सरकारकडून राबविण्यात आलेल्या निर्णयाचा फायदा सर्व सामान्य जनतेला होत असल्याने आगामी काळात देखील आमचे सरकार निवडणुकांमध्ये विजयी होईल असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांनी केली.

पक्ष बळकटीकरणसाठी व पक्षाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मंगळवारी नगर दौर्‍यावर होते. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात आणि केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने विकासकामांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील या सरकारने जीएसटी कर प्रणाली देशात पहिल्यांदाच लागू करत कररचनेत अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. मोदीं सरकारच्या काळात घेण्यात आलेला नोटबंदीचा निर्णयबाबत बोलताना आठवले म्हणाले, देशातील जनतेच्या हितासाठी नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. देशातील काळा पैसा वाढू नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आधार घेत मोदी सरकारने नोटाबंदी केली होती. सध्या देशातील जनता पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे चिंतेत आहे. वाढती महागाई कमी कारण्यासाठी आम्ही देशातील नागरिकांच्या बरोबर आहोत. लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वसन यावेळी बोलताना आठवले यांनी दिले.

दक्षिण मुंबईतून निवडणूक लढविणार
पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून आठवले हे दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर त्यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातुन निवडणुक लढविली होती परंतु या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता सुरक्षित मतदारसंघाचा शोध घेतला आहे. आगामी 2019 ची लोकसभेची निवडणूक त्यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा – दलितांमध्ये वाद नको
आगामी निवडणुकांबाबत बोलताना आठवले म्हणाले की, दलितांच्या मताशिवाय मराठा व मराठ्यांच्या मताशिवाय दलित निवडून येणार नाही. यामुळे मराठा दलित वाद ठेवावी अशी भूमिका पक्षाची आहे. आमदार व खासदार आम्ही स्वबळावर निवडून आणू शकत नाही यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवणे शक्य होईल. यासाठी सर्वानी प्रयत्न करावे अशी मागणी आठवले यांनी केली.

LEAVE A REPLY

*