मनमाड, मालेगावला अवकाळी बरसला; तापमान घटल्याने नागरिकांना दिलासा

0

मालेगाव/मनमाड : मान्सूनपूर्व पावसाने आज (गुरुवारी) दुपारी मनमाड शहर परिसराला मनसोक्तपणे झोडपून काढले.पावसा सोबत वादळी वारा ही होता मात्र वाऱ्यामुळे कुठे ही काही ही नुकसान झाले नाही.

अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन बाजारात आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली तर खळ्यात-मळ्यात उघड्यावर असलेला कांदा भिजून खराब झाल्याने काही शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.

पाऊस सुरु होताच नेहमी प्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला होता.पावसामुळे तापमानात घट झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला

दोन महिन्या पासून तापमानात मोठी वाढ होऊन पारां ४२ अंशा पर्यंत  गेल्यामुळे प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे.गेल्या कागी दिवसा पासून आकाशात रोज काळे ढग येत होते मात्र पाऊस काही पडत नव्हता त्यामुळे उष्म्यात मोठी वाढ झाली होती.

अखेर आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास मेघ गर्जना करीत वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले.सुरुवातील तुरळक सरी पडल्या मात्र त्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली सुमारे अर्धातास पावसाने शहर परिसराला अक्षरशः झोडपून काढले.अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.काही शेतकरी व  व्यापाऱ्यांचा खळ्यात-मळ्यात उघड्यावर कांदा ठेवलेला होता.

पावसाने तो भिजून खराब झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.पावसामुळे वाढलेले तापमान खाली आल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.मान्सूनपूर्व पावसाने ठिकठिकाणी चांगली हजेरी लावल्याचे पाहून यंदा वेळेवर पाऊस पडेल असे गृहीत धरून बळीराजा खरिफ हंगामाच्या मशागतीला लागला आहे

मालेगावातही दुपारी जोरदार पावसाचे आगमन झाले. वादळामुळे अनेक भागात वीजेचे लपंडाव सुरु होते तर काही भागामध्ये अजूनही वीज आलेली नसल्याचे समजते.

सर्व फोटो : हेमंत शुक्ला / बब्बू शेख

LEAVE A REPLY

*