जीएसटीमुळे असंघटित क्षेत्राला जबर फटका – जयंत पाटील

मुक्त संवादात व्यापाऱ्यांना दिली महत्वपूर्ण माहिती

0

 

नाशिक प्रतिनिधी | जीएसटी येण्यापूर्वी वॅट आणताना सरकारने देशातील सर्व राज्य व या राज्यातील सर्वच व्यापारी तसेच उत्पादक घटकांना विश्वासात घेतले होते. व्हॅट लावण्यापूर्वी त्यांना दोन ते तीन महिने वेळ देण्यात आला होता. परंतु जीएसटी लागू करताना कोणत्याही व्यापाऱ्याला विश्वासात न घेता केवळ सेल्स टॅक्स च्या लोकांनी तसेच केंद्र सरकारने एकतर्फी हा कायदा तयार केला आहे.

त्याचे विपरीत परिणाम आता दिसत असून देशात असलेल्या 12 टक्के असंघटित क्षेत्राला याचा जबर फटका बसला आहे की असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले.

नाशिकमध्ये हॉटेल पंचवड येथे व्यापाऱ्यांसाठी आयोजित मुक्त संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर ऍड विलास लोणारी होते. जीएसटी लागू करताना तो सरसकट 18 टक्के व जीवनावश्यक वस्तुंना 4 टक्के लावावा अश्या सूचना करण्यात आल्या होत्या परंतु त्या मान्य केलेल्या नाहीत.

या कराचे दुष्परिणाम दिसू लागताच आधी 27 वस्तूंचे तर गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांचा रोष पाहता 200 वास्तूवरील कर कमी केले. त्यामुळे हा कर केवळ सरकारच्या मनमाणीचा ठरला आहे. आज 60 टक्के व्यापार थांबला आहे. नॉटबंदीनंतर केंद्र सरकारने जीएसटी आणून आणखी अडचणीत भर टाकली.

केंद्र सरकारने या कायद्यात राज्यांना काहीच अधिकार दिले नाहीत. त्यामुळे हा कर लागू केल्यानंतर खडखड वाढली. वॅट लागू करताना त्या त्या राज्यांना त्यांचा अधिकार तसेच महसुलाच्या विचार केलेला होता. सरकारने देशाच्या अर्थव्यस्थेबरोबर खेल केला आहे.

आधी जीएसटी आणला असता व त्यानंतर नॉटबंदी लागू केली असती तर गोष्ट ठीक होती. या करामुळे लोकांना आपला कायदा वाटला पाहिजे होता. परंतु अजूनही हा कर अस्थिर आहे. त्यामुळे व्यापारी अस्थिर आहेत. नॉटबंदीनंतर अनेक आश्वासने सरकारने दिली. परंतु आकडेवारी सांगते 99 टक्के नोट्या बँकेत परत आल्या पण 1 टक्के नोट राहिल्या. छापे टाकून 1 हजार2 3 कोटी बेकायदेशीर नोटा सापडल्या.

याशिवाय 17 हजार कोटींची न दाखवलेली संपत्ती सापडली. पण सीनजी रिपोर्ट सांगतो 18 हजार त्यानंतर 19 हजार तर त्यानंतरही अजून 80 हजार कोटी सापडले. परंतु 0.0007 व नंतर 0.0002 टक्के नोटा सापडलेल्या. नॉटबंदीनंतर काय साध्य केलं. दहशत थांवेल असेही सरकारने सांगितले होते परंतु 38 टक्क्यांनी वाढ झाली. पण काश्मीर खोऱ्यात शाहिद जवानांची टक्केवारी वाढली. मारणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली.

बाहेरील गुंतवणूक थांबली : अनेक राज्यामधील गुंतवणूक थांबली आहे ज्या महाराष्ट्रात 8.5 लाख कोटींची गुंतवणूक होती ती आता ठप्प आहे. याशिवाय अन्य परकीय गुंतवणूक देखील थांबली आहे. त्यामुळे कायदा अस्थिर ठरलेला आहे.

काळ्या धनाच काय? : नॉटबंदीनंतर काळे धन बाहेर येईल, दहशतवाद थांबेल तसेच काही चांगले बदल होतील असे सांगतीले होते. परंतु त्यानंतर काहीही अपेक्षित बदल घडले नाही. परंतु 500 व 1000 च्या नोटा बंद करून 2000 नोटा का आणल्या हे गमक लक्षात आले नाही. असेही पाटील म्हणाले.

अर्थव्यवस्थेशी खेळू नका : मी मागील काही दिवसात पंतप्रधान मोदींना खेळण्याच्या नोटा पाठवल्या व त्यांना पत्र पाठवून या नोटांशी खेळा पण भारतीय अर्थव्यवस्थेशी खेळू नका अशी विनंती मी सरकारला केली आहे. असे पाटील यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.

व्यापाऱ्यांनी मांडले प्रश्न : करात असलेली तफावत, सरकारच्या घोषणा व प्रत्यक्षात कराचे दर याबाबत व्यापाऱ्यांनी जयंत पाटील यांनी प्रश्न विचारले यावेळी पाटील यांनीही दिलखुलासपणे अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.

LEAVE A REPLY

*