‘युनो’ परिषदेसाठी डॉ. गोसावी महाराष्ट्र सदस्यांचे प्रमुख

0
नाशिक | दि. ९ प्रतिनिधी
भारताला संयुक्त राष्ट्र संघटनेत (युनो) कायमस्वरुपी स्थान मिळावे, यासाठी नेपाळची राजधानी काठमांडू येथे डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारतासह २० देशातील प्रतिनिधी परिषदेसाठी उपस्थित राहतील
भारतातून प्रत्येक राज्यांचे सदस्य सहभागी होणार आहे. यात महाराष्ट्रातून सहभागी होणार्‍या सदस्यांचे प्रमुख म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॅा. मो. स. गोसावी यांची निवड झाली आहे. अशी माहिती नेपाळच्या उपराष्ट्रपतींचे विशेष सल्लागार महावीर प्रसाद टोरडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोखले एज्युकेशन सोसायटी यंदा शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. यानिमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या महावीर टोरडी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य डॉ. पी. सी. कुलकर्णी, प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. प्रा. वृन्दा भार्गवे आदी मान्यवर उपस्थित होते.

टोरडी म्हणाले, भारत व नेपाळ या दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय सबंध कायस्वरुपी मैत्रत्वाचे राहीले आहेत. आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेपाळने सतत प्रयत्नशिल आहे.

युनोत भारताला कायमस्वरुपी स्थान मिळावे अशी भूमिका नेपाळने स्विकारली असून त्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय समरसता मंच’च्या माध्यमातून अन्य देशांचे सहकार्य मिळवण्यासाठी २८ डिसेंबर रोजी काठमांडू येथे २० देशांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे.
१९४५ मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेत आशिया खंडाचे नेतृत्व चीनकडे आहे. चीन भारतानंतर स्वतंत्र झाला असून येथील राजकीय व्यवस्था लोकशाहीवर आधारीत नाही. स्थापना झाल्यापासून ‘युनो’ संघटनेने आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत.
परिषदेत महाराष्ट्रातून १२५ सदस्य सहभागी होत असून त्यांची जबाबदारी डॉ. मो. स. गोसावी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. परिषदेचा अहवाल ‘युनो’कडे सुपूर्द करणार असल्याचे टोरडी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*