चांदवडला पीककर्जाच्या रक्कमेवर अज्ञात चोरट्याचा डल्ला

0
चांदवड | शहरातील आठवडे बाजारात आलेल्या शेतकर्‍याच्या गाडीच्या डिकीतून लाख रूपये लंपास झाल्याची घटना सोमवार (दि.१०) रोजी घडली.

तालुक्यातील हिवरखेडे येथील शेतकरी भिकाजी गणपत वाघ(वय ५३) यांनी येथील कार्पोरेशन बँकेत मंजूर झालेले पीककर्ज ३ लाख ४५ हजारांपैकी  आज खरीपाच्या तयारीसाठी भांडवल म्हणून १ लाख रूपये काढले.

ते त्यांनी आपल्या मोटारसाकल (क्र.एमएच १२ डीसी १३९०) च्या डिकीत ठेवले व येथील घोडकेनगरातील मोदी हॉस्पिटल जवळ मोटारसायकल लाऊन  कामानिमीत्त बाजूला गेले.

तिकडून आल्यावर डीकीचे कुलूप तोडून अज्ञाताने पीककर्जाचे १ लाख रूपये लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी वाघ यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार दीपक मोरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*