Thursday, May 2, 2024
Homeनाशिकइंदिरानगर : अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र ओरबाडले

इंदिरानगर : अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र ओरबाडले

इंदिरानगर | Indiranagar

अज्ञात चोरट्यांनी चार्वाक चौक येथुन महिलेचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशा विजय पेटारे (६५ गुरूषक्ती सोसायटी फ्लॅट नंबर 9) या पती व मुलीसमवेत मंगळवार (दि१६) रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास रथचक्र चौकातून पायी घरी जात होते.

यावेळी चार्वाक चौकातील दुचाकीवर आलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंमत सुमारे 1 लाख 20 हजार रुपये बळजबरीने ओरबाडुन पळ काढला.

याबाबत इंदिरा नगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या