नगराध्यक्षा आदिकांची बदनामी : अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा गोविंदराव आदिक यांची दि. 6 मे 2017 ते 12 सप्टेंबर 2017 या कालावधीत त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या फेसबुक पोष्ट टाकून बदनामी केली.
तसेच श्रीरामपूर नगरपालिका या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याबाबतीत आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी केली आहे.
याप्रकरणी हरदीपसिंग उर्फ लकी बजींदरसिंग सेठी यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 500 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून फेसबुकवर पोष्ट टाकणारा व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेज टाकणार्‍याचा पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल हाफसे हे शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

*