आरोग्य विज्ञान विद्यापीठ विविध प्राधिकरण निवडणूक : नाशिक मुख्यालयात 151 उमेदवारी अर्ज

0
नाशिक |  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी विविध जागांच्या नाशिक मुख्यालयात 151 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे.

विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ जसे अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यासमंडळावरील विविध सदस्यांकरीता निवडणुक घेण्यात येते. या अनुशंगाने सदस्य निवडीकरीता विद्यापीठातर्फे निवडणुक घेण्यात येणार आहे. याबाबतची अधिक माहिती व सुचना विद्यापीठाचे संकेतस्थळ ूूूण्उनीेण्ंबण्पद यावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठ निवडणुक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचे नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद विभागीय केंद्रावरदेखील अर्ज जमा करण्याची सोय करण्यात आली होती. तेथील अर्ज एकत्रित केल्यानंतर एकूण उमेदवारांच्या अर्जांची संख्या समजू शकेल असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, प्राप्त अर्जाची विद्यापीठ मुख्यालयात दि. 11 डिसेंबर 2017 रोजी छानणी करण्यात येईल. छानणी उपरांत उमेदवारांच्या वैध अर्जाची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

या निवडणुक प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मुदत दि. 20 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत असणार आहे. निवडणुकीकरीता उमेदवारांची अंतीम यादी दि. 21 डिसेंबर 2017 रोजी प्रसिध्द करण्यात येईल.

विद्यापीठाची विविध प्राधिकरण निवडणुक दि. 28 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 04:00 वेळेत विविध मतदान केंद्रावर रावविण्यात येईल. या मतदानाची मतमोजणी दि. 30 डिसेंबर 2017 रोजी विद्यापीठ मुख्यालयात करण्यात येईल त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*