Type to search

जळगाव फिचर्स

विद्यापीठाची जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा आजपासून

Share

जळगाव – 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचा मान येथील नूतन मराठा महाविद्यालयाला मिळाला असून स्पर्धेचे सोमवार दि.30 रोजी सकाळी 10 वाजता पुणे येथील डीआरडीओ येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रसाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

बहिणाबाई चौधरी विद्यापीठाची वेगवेगळ्या ठिकाणी चार अविष्कार स्पर्धा घेण्यात येत आहे. यात जळगाव जिल्ह्याची स्पर्धा नूतन मराठा महाविद्यालयात होत आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनला अध्यक्ष  म्हणून कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील  राहतील. तसेच संस्थेचे चेअरमन नीळकंठ काटकर, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद समितीचे सदस्य दिलीप पाटील, दीपक पाटील, डॉ.प्रीती अग्रवाल, डॉ.सुभाष चौधरी, प्रा.डॉ.नितीन बारी, प्रा.डॉ.जे.बी.नाईक, प्रा. डॉ.एल.पी देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे.

या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील 49 महाविद्यालयांमधील 1 हजार 327 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यात 102 मॉडेल व 615 पोस्टर सादरीकरण होणार आहे. स्पर्धा पदवी, पदव्युत्तर, पदवी व शिक्षक अशा चार विभागात होणार असून पोस्टर, मॉडेलव्दारे विद्यार्थी आपल्या संशोधनाचा विषय मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेत सादर करणार आहे. या स्पर्धेत सहा गट तयार करण्यात आले आहेत.

त्यात पहिल्या गटात सामाजिकशास्त्रे, भाषा, मानव्यविद्या, ललित कला, दुसर्‍या गटात वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, तिसर्‍या गटात विज्ञान शाखा, त्यात भौतिक शास्त्र, जीवन शास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, गृह आणि संगणकशास्त्र आहेत. चौथ्या गटात कृषी व पशुसंवर्धन, पाचव्या गटात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सहाव्या गटात औषधनिर्माण शास्त्र यांचा समावेश आहे.

स्पर्धेसाठी मुख्य नियोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.पी देशमुख असून सदस्य डॉ.एस.ए. गायकवाड, डॉ.ए.वाय.बडगुजर,डॉ.एन, जे. पाटील, डॉ.एन.एम पाटील, डी.एल.पाटील हे आहेत. याशिवाय 18 उपसमित्या कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मदत संपर्क कक्षदेखील स्थापन करण्यात आला आहे.

 

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!