Type to search

Featured नाशिक

पिंपरखेड माध्यमिक विद्यालयात अनोखा ‘हिवाळा’ उपक्रम

Share

पिंपळखेड | दिपाली गडवजे

हिवाळा म्हणजे ऊर्जा साठविण्याचा ऋतु. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा यापैकी हिवाळा हा सर्वात उत्तम ऋतू मनाला जातो. कारण हिवाळ्यात भूक भरपूर लागत असते व त्यामुळे शरीराला ऊर्जा भरपूर प्राप्त होत असते. परंतु त्या मानाने उर्जा कमी प्रमाणात खर्च होत असते. कारण हिवाळ्यात कितीही काम केले तरी थकवा येत नाही.

मात्र या ऋतुमध्ये सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो तो शालेय विद्यार्थ्यांना. कितीही थंडी असली तरी त्यांना वेळेत शाळेत पोहचावे  लागते. परिणामी खूप सारे विद्यार्थी आजारी देखील पडतात. दुरून पायी चालत येणारे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात थंडीचा सामना करावा लागतो. भल्या सकाळी रस्त्यावर धुके असल्याने रस्ता दिसणे देखील अवघड होऊन जाते. अनेक वेळा तर अपघात देखील होत असतात.

त्यामुळे पिंपरखेड येथील माध्यमिक विद्यालयात सुरुवातीचे दोन तास क्रीडांगणामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उपक्रम सुरू केला असून वर्गाप्रमाणे बसवून क्रीडांगणावरच तास घेण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या संकल्पनेमुळे मुलांचे आरोग्य सुधृढ राहण्यास मदत होत आहे. थंडी पासून बचाव होत असल्याकारणाने विद्यार्थ्यांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. यासोबतच विविध प्रकारचे खेळ हे विद्यार्थ्यांना खेळण्यास सांगितले जाते. त्याच बरोबर रोज प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून योगा करून घेतला जातो त्यासह  योग अभ्यासाचे महत्त्व देखील विध्यार्थ्यांना सांगितले जाते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!