केंद्रीय मंत्री उमा भारती यांची त्र्यंबकला अचानक भेट; दोन तास केली विधीवत पूजा

0
त्र्यंबकेश्वर (मोहन देवरे) |  काल (दि 10) रात्री केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली. दोन तास त्यांनी येथील मंदिरात दोन तासांपेक्षा जास्त वेळ थांबून संपूर्ण पूजापाठ केला.  पुरोहित विजय व कोशिक अकोलकर यांनी संपूर्ण पूजापाठ केल्याची माहिती प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.

यावेळी त्र्यंबकराजाची प्रतिमा देऊन भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुयोग वाडेकर व हर्षल भालेराव महिला आघाडीच्या माधुरी जोशी यांनी त्यांचे स्वागत केले.

नगराध्यक्षा तृप्ती धारने यांनी गोदावरीच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेऊन केंद्र शासनाने सहकार्य करावे अशा मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री उमा भारती यांना दिले. मंदिराचे विश्वस्त श्रीकांत गायधनी यांनी ट्रस्टच्यावतीने स्वागत केले. भाजपचे शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र तसेच ट्रस्टचे अधिकारी वैद्य जोशी, तहसीलदार महेंद्र पवार यांचीही उपस्थिती होती.

केंद्रीय मंत्र्यांच्या अचानक दौऱ्यामुळे येथील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.  विश्वस्त ललिता शिंदे यांनी मंदिर पाठीमागे अहिल्या गोदा संगम दाखवीत या गंगेकडे केंद्राने लक्ष घालावे अशी मागणी केली. यानंतर उमा भारती यांनी ताबडतोब नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.

‘नो सेल्फी, नो फोटो’ असे भारती यांनी सुनावल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोडदेखील झाला होता मात्र काही वेळानंतर त्यांनी फोटो काढण्यास परवानगी दिली होती. पंडितजी मुझे सही द्वार से जाना है असे सांगत त्यांनी पूर्व बाजू नदीकश्वर दर्शन घेऊन मंदिरात गेल्या अभिषेक प्रसंगी भगवान कृष्ण मूर्ती त्याच्या सोबत होती.

मंदिर प्रदक्षिणा करत असतांना अचानक भारती यांची नजर त्रिशुळावर गेली. त्यानंतर त्यांनी त्रिशुळाजवळ जात बराच वेळ त्रिशूळाला हात लाऊन ठेवला होता.

त्रिशूळ लहान असते तर उमा भारतींनी उचलले असते अशी चर्चा याठिकाणी होती. भारती यांनी भगवे वस्र परिधान केले होते. मंदिराचे पुजारी कैलास पाळेकर यांनी त्यांना मंदिराची माहिती दिली.

LEAVE A REPLY

*