Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशदेशाचा अर्थसंकल्प १ फेब्रवारीला

देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रवारीला

नवी दिल्ली:

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होणार आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागांत चालणार आहे. १ फेब्रवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात कोव्हिड सरचार्ज लावला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या साथीमुळे केंद्र सरकारने यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन घेतले नव्हते. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आता २९ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच पहिला टप्पा सुरू होणार असून १६ फेब्रुवारीपर्यंत चालेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा ८ मार्चपासून सुरू होणार असून ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रवारीला अर्थसंकल्प सादर करतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या