Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ : पेट्रोल डीझेल दरवाढीचे संकेत; कस्टम ड्युटी १ रुपयांनी वाढणार

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी 

अर्थसंकल्पीय भाषणाला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक घोषणांचा पाउस मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये पाडला. जाता जाता पेट्रोल आणि डीझेलवरील कस्टम ड्युटी एक रुपयांनी वाढविणार असल्याचे सांगत पेट्रोल आणि डीझेल आगामी काळात वाढण्याचे संकेतही त्यांनी दिले.

आधीच कच्च्या तेलाच्या किंमती अस्थिर राहिल्यामुळे पेट्रोल आणि डीझेलचे दर भारतात गगनाला भिडले आहेत. दररोज हे दर कमी जास्त होत आहेत.

असे असताना कस्टम ड्युटी वाढविणार असल्याचे संकेत दिल्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आधीच दरवाढीने त्रस्त झालेल्या वाहनधारकांना आजच्या बजेटने पुन्हा खिसा खाली करायला लावल्यामुळे नाराजीचा सूर निघण्याची शक्यात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!