राहाता, श्रीरामपूरमध्ये लवकरच मूग, उडीद व सोयाबीनचे खरेदी केंद्र : केंद्रिय कृषीमंत्री राधामोहन सिंह

0
शिर्डी (शहर प्रतिनिधी)- राहाता व श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मूग, उडीद आणी सोयाबीनचे हमी भावाने खरेदी केंद्र सुरू करावे, असे निर्देश आपण अधिकार्‍यांना दिले असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी दिली.
केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी शनिवारी रात्री उशीरा साईदर्शन घेऊन शेजआरतीस हजेरी लावली. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, खा. सदाशिव लोखंडे, विश्‍वस्त भााऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांचा सत्कार केला. त्याअगोदर सायंकाळी शिर्डी नगरपंचायतीच्या भाजपाच्या नगरसेवीका अंजली रवींद्र गोंदकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर भाजपाचे तालुका सरचिटणीस रवींद्र गोंदकर यांच्या आग्रहाखातर कृषीमंत्री सिंह यांनी गोंदकर यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन घेतले. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर उत्तर देताना त्यांनी सांगितले शेतकर्‍यांच्या 80 ते 85 टक्के शेतमाल खरेदीचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असून मूग, उडीद आणी सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आली आहे.
यासाठी महाराष्ट्रातील सर्व खरेदी केंद्रांवर नाफेड मार्फत ग्रेडर नेमण्याचे आदेश आपण दिल्याचे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितले.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, नगरसेवक शिवाजी गोंदकर, सचिन शिंदे, दिलीप संकलेचा, सुनील वैजापूरकर, डॉ. संतोष गोंदकर, अमोल कोते आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*