शनी दर्शनाने ऊर्जा मिळते : केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग

0
सोनई(वार्ताहर) – शनी शिंगणापूरला यापूर्वी मी अनेकदा आलो आहे. या ठिकाणी येऊन दर्शन घेतल्याने नेहमी समाधान आणि ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी शनिवारी शिंगणापूरमध्ये केले.
शनिवारी सायंकाळी उशिरा अचानक केंद्रीय मंत्री शनी शिंगणापूरला दर्शनासाठी आले होते. यावेळी खा. सदाशिव लोखंडे, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष माजी आ. चंद्रशेखर कदम, नगर महापालिकचे नगरसेवक सुवेंद्र गांधी हे केंद्रीय मंत्री सिंगयांच्या सोबत उपस्थित होते.
यावेळी सिंग यांनी उदासी महाराज यांच्या मठात शनी अभिषेक केला आणि दर्शन घेतले. त्यानंतर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात आल्यानंतर त्या ठिकाणी विश्‍वस्त आदिनाथ शेटे व अप्पासाहेब शेटे यांनी शाल, श्रीफळ आणि प्रतिमा देवून केंद्रीय मंत्री मोहन यांचा सन्मान केला.
यावेळी मंत्री माहेन म्हणाले, यापूर्वी मी अनेकदा शनी शिंगणापूरला आहे. या ठिकाणी येवून दर्शन घेतल्यानंतर नेहमी समाधान व काम करण्यास ऊर्जा मिळते. शिंगणापूर या आगळ्या-वेगळ्या गावाची ख्याती जगात असल्याचे उद्गार केंद्रीय मंत्री मोहन यांनी यावेळी काढले.
यावेळी शनी शिंगणापूर देवस्थानचे खजिनदार योगश बानकर, विश्‍वस्ता शालीनीताई लांडे, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष नवनीतभाई सुपुरीया, दीपक दरंदले, भागवत बानकर, आदी उपस्थित होते.

केंंद्रीय मंत्री मोहन यांचा दौरा जिल्ह्यातील दोन खासदारांनाच माहिती होता.  देवस्थान ट्रस्टलाही मंत्री मोहन येणार असल्याचे कळवण्यात आले. यापूर्वी मंत्र्यांचा दौरा असल्यास कार्यकर्त्यांना कळवण्यात येत असे. मात्र, मोहन यांच्या दौर्‍यांची माहिती नसल्याने ठरावी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. कार्यकर्त्यांचा गराडा कमी असल्याने मंत्र्यांना शांतपणे दर्शन घेता आले. 

LEAVE A REPLY

*