कुंभमेळ्याचा युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश

0
नवी दिल्ली दि 8 | भारताचा कुंभमेळा हा युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा ( Intangible Cultural Heritage ) म्हणून जाहीर केला आहे. जगभरातल्या 11 देशातील विविध पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळ, हस्तकला आदींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

भारताच्या कुंभमेळा हा पृथ्वीतलावरचा एक सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे, दर तीन वर्षांनी एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षात अलाहाबाद ( प्रयाग), उज्जैन, नाशिक- त्रिंबकेश्वर, हरिद्वार, या चार वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळे भरत असतात. भारतातून कोट्यवधी भाविक कुंभमेळ्यास हजेरी लावत असतात. या उत्सवाची दखल युनेस्कोने घेतली असून जागतिक वारसा यादीत या धार्मिक सोहळ्याचा समावेश करण्यात आला आहे.

भारताच्या कुंभमेळ्या बरोबरच कझाकिस्तानचा पारंपरिक खेळ अस्यक ( Assyk), पोर्तुगाल या देशाची इस्ट्रेमोज ( Estremoz clay figures) ,जर्मनी या देशाचे ऑर्गन हस्तकला व संगीत तर मलावी या देशाची मातीची भांडी ज्याला सीमा (Nsima) याचा समावेश आहे. किरगिस्तान या देशाचा कोकबोरू हा घोडस्वारीचा खेळाचा तसेच इटली या देशाचा नेओपोलिटीन या कलेचा समावेशही अमूर्त सांस्कृतिक वारसा या यादीत करण्यात आला आहे.

इराण या देशातील चोगण (Chogan) या घोडेस्वारी खेळाने सुद्धाय यादीत स्थान पटकाविले आहे. अझरबैजन या देशातील संगीत वाद्य कमांचा( Kamancha) तर ग्रीस या देशाचे रेबीटीको हे संगीत वाद्याचा तर आयर्लंड या देशाचे उईलेन ( Uilleann ) हे संगीत वाद्य अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबत युनेस्कोने आपल्‍या ट्विटर अकाऊंटवरून ही घोषणा करून भारताचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

*