शासनाकडून कांद्यावर अघोषित निर्यातबंदी

कांदा निर्यातमूल्य ८५० डॉलर प्रतिटन

0
लासलगाव| दि.२३ वार्ताहर- स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८५० डॉलर प्रति टन केले. किरकोळ बाजारात कांद्याने ७० रुपये किलोचा दर ओलंडल्याने गुजरात विधानसभा निवडणूकीवर त्याचा परिणाम होवु नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

आज वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात मूल्य दरात २५ डिसेंबर २०१५ नंतर प्रथमच शून्यावरुन वाढ करत तब्बल ८५० रुपये डॉलर प्रतिटन केल्याने सरकारने एक प्रकारे कांद्यावर अघोषित निर्यातबंदी केल्याचे व्यापारी दबक्या आवजात बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर मागील २१ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचले असुन बाजारपेठांमध्ये कांदा ३९४० रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला जात आहे. राजकीयदृष्टया संवेदनशील असलेला कांदा सत्तेतून पायउतार ही करु शकतो हा अनुभव असल्याने कांदा म्हटले की सरकारला चांगली धडकीच भरते म्हणुन कांद्याबाबत कोणतीच जोखीम सरकार घ्यायला तयार नाही.

मात्र या निर्णयाने शेतकरी मात्र चांगलाच हतबल झाला आहे. ज्यावेळी माल नसतो त्यावेळी भाव असतो आणि आता मालही आहे भाव आहे त्यात सरकारचे आडमुठे धोरण. त्यामुळे शेतकर्‍यांनी पिकवायचे तरी काय असा प्रश्‍न आता विचारला जात असुन शासनाच्या या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

LEAVE A REPLY

*