‘जीएसटी’समजून घ्या एका क्लिकवर; नाशिककर सॉफ्टवेअर कंपनीने बनवले अनोखे मोबाईल अ‍ॅप

0

नाशिक । केेंद्र सरकारने वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी एक तारखेपासून केली आहे. जीएसटीचे अनेक नियम आणि अटी तसेच शर्ती ठेवण्यात आल्यामुळे अजूनही अनेकांना जीएसटी संपूर्णपणे समजायला अवघड झाले आहे. स्मार्टफोनच्या जगात आता नाशिकमधील विंजित टेक्नोलॉजी या सॉफ्टवेअर कंपनीने दोन दिवसांपूर्वीच ‘जीएसटी एचएसएन’ कोड नावाच्या एका मोबाईल अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे.

याद्वारे जीएसटीचे नियम अटी तसेच कराची टक्केवारी समजण्यासाठी या अ‍ॅपमुळे सोपे होणार असून दोनच दिवसांत जवळपास दहा हजार युझर्सने हे अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेतले आहे.

एचएसएन (हार्मोनाईस्ड सिस्टम ऑफ़ नॉमेनक्लेचर), एसएसी (सर्व्हिस अकाऊंटींग कोड), जीएसटी संदर्भातील सर्व फॉर्म, जीएसटीचे वस्तू व सेवांवरील कर, जीएसटी कराची वर्गवारी (यामध्ये शून्य टक्क्यांपासून 28 टक्क्यांपर्यंत वर्गवारी करण्यात आली आहे) जीएसटीची कार्यप्रणाली, जीएसटीचे नियम अटी आणि शर्ती आदींची समावेश करण्यात आला आहे.

यासोबतच 2016 च्या विधेयकानुसार जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई याची माहितीदेखील या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दोनच दिवसांत या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनने दहा हजार युझर्सचा पल्ला गाठला आहे. हे अ‍ॅप्लिकेशन आयफोन आणि अ‍ॅण्ड्रॉईडच्या सर्व मोबाईल तसेच टॅबवर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. गुगल प्लेस्टोर किंवा अ‍ॅप स्टोरमध्ये जीएसटी एचएसएन असे टाईप केले तर निंजितचे हे अ‍ॅप स्मार्टफोन धारकांना आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येते.

विशेष म्हणजे हे अ‍ॅप युझर्सच्या मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानाही एचएसएन कोड ऑफलाईन बघता येणार आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

जीएसटीमधील कोड या अ‍ॅपमुळे एका क्लिकवर प्राप्त होत आहेत. तसेच या अ‍ॅपमधील माहिती वेगवेगळ्या प्रादेशिक भाषामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याने सर्वसामान्य व्यक्तीलाही यातून माहिती मिळवणे सोपे झाले आहे.

LEAVE A REPLY

*