Thursday, May 2, 2024
Homeनाशिकभूमिगत गटारीचेकाम निकृष्ट; जि.प.सदस्याची सीईओंकडे तक्रार

भूमिगत गटारीचेकाम निकृष्ट; जि.प.सदस्याची सीईओंकडे तक्रार

हरसूल । वार्ताहर | Harsul

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar taluka) ठाणापाडा (thanpada) येथे रुर्बन योजनेंतर्गत भूमिगत गटारीचे (Underground sewers) काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून त्या कामाचे दक्षता व गुण – नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी,

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की, ठाणापाडा ता. त्र्यंबकेश्वर येथे श्यामा प्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन योजनेंर्तगत भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. टाकण्यात आलेले गटारीचे पाईप आणि खोदकाम तसेच कोणताही पाया न बनविता करण्यात आलेले आहे. पाईप फिटिंग आणि बनविलेल्या चेंबरला अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरलेले आहे.

बांधण्यात आलेल्या कामावर एकही दिवस पाणी मारण्यात आलेले नाही. गावात ज्या भागात गटारीची गरज आहे, त्या भागात भूमिगत गटारीचे (Underground sewers) काम न घेता भलत्याच ठिकाणी करण्यात आले आहे. यामुळे गावाला त्याचा कुठलाही फायदा न होता फक्त पैशाचा अपव्यय करण्यात येत आहे.

सदर कामाची दक्षता व गुण नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, बोगस कामे करून बिले काढण्याचा प्रकार थांबविण्यात यावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ यांनी जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या