Type to search

नाशिक

भुयारी गटार योजनेचे चेंबर महिन्यातच तुंबले

Share

दे. कॅम्प । वार्ताहर

शहरात स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत कोटी रूपये खर्च करून भुयारी गटार योजनेची कामे झाली असुन या कामात अनियमितता आढळून आल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वॉर्ड क्र.7 मधिल शिंगवे बहुला, आंबडवाडी भागात भुयारी गटार योजनेचे चेंबर महिनाभरात तुंबल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे.

शिगवे बहुला परिसरात सांडपाणी आता चेंबर्सच्या झाकणातून बाहेर फेकले जात आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच डेंग्यू, मलेरियाचे प्रमाणे सर्वत्र वाढत असल्याने या भागात त्याची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भुयारी गटार योजनेत सुरू असलेली कामात मोठी अनियमिता असून या कामाचे ऑडिट होणे गरजेचे आहे. या कामांची कॅन्टोमेंट बोर्ड प्रशासनांने चौकशी होणे गरजेची आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत वेळीच दखल न घेतल्यास शिवसेना, युवासेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना शहरप्रमुख प्रमोद मोजाड यांनी दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!