अघोषित लोडशेडिंगने रहिवासी त्रस्त

0
नवीन नाशिक | दि. ६ प्रतिनिधी- पावसाळा सुरू होऊनही वीज पुरवठ्यातील तक्रारींचे निवारण करण्याच्या दृष्टीने वीज वितरण कंपनीकडून पावसाळापूर्व कामे पूर्णत्वास गेली नसल्याने पावसाच्या पहिल्या तडाख्यातच नवीन नाशिककरांना विजेच्या अघोषित लपंडावाचा सामना करावा लागत आहे.

प्रत्यक्ष पावसाळ्याला सुरूवात झालेली नसली तरी मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनानेच वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षमतेचे वाभाडे निघाले आहेत. अजूनही अनेक ठिकाणी वीज तारांना अडथळा ठरणार्‍या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम पूर्ण झालेले नाही.

वीज जनित्रांच्या सुरक्षेबाबतही पुरेशी काळजी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन-तीन दिवसांपूर्वीच उत्तमनगर भागात अचानक विजेचा दाब वाढून जवळ जवळ ५० पेक्षा जास्त टिव्ही, पंखे, फ्रीज, कॉम्प्युटर, सेटटॉप बॉक्स जळाल्याची घटना घडली होती.

परिसरातील बहुतांश केबल कालबाह्य झाल्या असून जुन्या केबलवर वाढीव विजेच्या दाबामुळे शॉर्टसर्किट होणे, वीज जनित्रांचे स्फोट होणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व जुन्या केबल बदलण्याची आवश्यकता असून त्यासाठी वीज वितरण कंपनीने नियोजन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांन ीव्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*