उमराळे विषबाधा प्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा; केटरर्स, आचारी ताब्यात

0
नाशिक | उमराळे येथील विषबाधा प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी जेवण तयार करणारा केटरर्स सुनिल वडजे व आचारी सिताराम वाकळे यांना ताब्यात घेतले आहे. तसेच कंपनीचे व्यवस्थापक सुनिल मुळे व इतर अधिकारयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दिंडोरी तालुक्यातील उमराळे गावात धात्रक वस्तीवर गुरूवारी बायर सीडस् या बियाणे कंपनीने शेतकरंयासाठी ‘संकरीत टोमॅटो’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात कंपनीने दिलेल्या स्नेहभोजनानंतर सुमारे 100 ते 150 शेतकरयांना जेवणातून विषबाधा झाली त्यात गावातील अतुल पांडुरंग केदार, वय 41 या शेतकरयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तसेच काही शेतकरयांना मळमळ व उलटीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना नाशिक येथे जिल्हा शासकीय रूग्णालय तसेच खाजगी रूग्णालयांमध्ये उपराचासाठी दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजक व केटरर्स यांना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार केटरींग चालक 1) सुनिल पोपट वडजे, रा. मडकीजाम, ता.दिंडोरी व जेवण बनविणारा आचारी 2) सिताराम भिमा वाकळे, राइंदिरानगर, दिंडोरी, ता.दिंडोरी यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आहे.

याशिवाय कार्यक्रमाचे आयोजक बायर सिडस् कंपनीचे रिजनल क्रॉप मॅनेजर 3) सुनिल मुळे व कंपनीचे इतर अधिकारी यांचेविरूध्द दिंडोरी पोलीस ठाण्यात भादवि कलम 304,328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर घटनेतील अटक करण्यात आलेल्या संशयितांसह अन्य संशयितांचा शोध घेणेसाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहे. सदर घटनेबाबत दिंडोरी पोलीस ठाण्याचेे पोलीस निरीक्षक राजेष शिरसाठ यांच्यासह तपास पथकातील कर्मचारी हे पुढील तपास करीत आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असुन पुढील तपास चालु आहे.

LEAVE A REPLY

*