#UKElection2017 : मतमोजणीला सुरुवात

0

ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लेबर पार्टी 205 जागांवर विजयी झाली असून कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने 191 जागा जिंकल्या आहेत.

तत्पूर्वी एक्जिट पोलमध्ये थेरेसा मे यांच्या हुजूर पक्षाला बहुमत गमवावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बहुमत गमवावे लागले तरी देशातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून हुजूर पक्षाचे स्थान कायम राहील.

तर दुसरीकडे मुख्य विरोधी मजूर पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मोठा फायदा होताना दिसतोय.

गुरूवारी ६५० जागांसाठी निवडणूक झाली. आतापर्यंत ६५० पैकी ५२० जागांचे निकाल जाहीर झाले असून थेरेसा मे यांच्या हुजूर पक्षाला २४३ जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी मजूर पक्षाला २२६ जागा मिळाल्या आहेत. स्कॉटिश नॅशनल पार्टीने ३२ जागा पटकावत तिसरे स्थान गाठले आहे.

ब्रिटनमध्ये सुमारे ४.५८ कोटी मतदार आहेत. बहुमतासाठी ३२६ जागा जिंकणे आवश्यक आहे.

सुमारे ३३०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (बीबीसी) एक्जिट पोलनुसार हुजूर पक्षाला ३२२ तर मजूर पक्षाला २६१ जागा मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*