Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

पंतप्रधान थेरेसा मे यांना दिलासा, अविश्वास ठराव नामंजूर

Share
लंडन: ब्रेक्झिट ठराव संसदेत मंजूर करुन घेण्यात अपयशी ठरल्यानंतर पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव थेरेसा यांनी जिंकला. मजूर पक्षानं थेरेसा मे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या बाजूनं 306 सदस्यांनी मतदान केलं. तर विरोधात 325 जणांनी मत नोंदवलं. त्यामुळे मे यांच्या सरकारवरचं संकट टळलं आहे. मात्र ब्रेक्झिटचं नेमकं काय होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

विरोधी पक्षनेते, मजूर पक्षाचे जेरमी कोर्बीन यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. यावेळी 306 जणांनी ठरावाच्या बाजूने तर 325 खासदारांनी विरोधात मतदान केलं. डिसेंबरमध्ये स्वत:च्या हुजूर पक्षाच्या खासदारांनी दाखल केलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात यशस्वी झालेल्या थेरेसा मे यांना पुन्हा अशा ठरावाला सामोरं जावं लागलं. याआधी बोलताना थेरेसा मे यांनी अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास पुढील आठवड्यात पुन्हा पर्याय घेऊन सभागृहात येऊ असं सांगितलं होतं.

ब्रेग्झिटबाबत पंतप्रधान थेरेसा मे यांना पुन्हा धक्का बसला होता जेव्हा संसदेत त्यांना 433 विरुद्ध 202 असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. ब्रिटनच्या जनतेने 2016 मध्ये ब्रेग्झिटच्या बाजूने निसटता कौल दिल्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या थेरेसा मे यांनी युरोपीय महासंघाशी दोन वर्ष वाटाघाटी केल्या. त्यासंदर्भातील ब्रेग्झिट करारावर मंगळवारी मध्यरात्री ब्रिटीश पार्लमेंटच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये मतदान झाले. त्यात 432 विरुद्ध 202 मतांनी पराभव होऊन हा करार फेटाळण्यात आला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!