शहा शरिफांचे दर्शन घेतल्याने मनाला अत्यंत प्रसन्न वाटते

0
विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम

अहमदनगर (प्रतिनिधी) – विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपण एका पवित्र दर्ग्याचे दर्शन घेतले व आपल्या मनाला खरोखर अत्यंत प्रसन्न्न वाटले. पीर सरकार हजरत शहा शरीफ दर्गा ही सर्वधर्मीयांचे श्रध्दा स्थान असून बाबांची शिकवण तरुणांनी आत्मसात करावी, देशाकरीता काहीतर करून देशाच्या कामी येण्याचे ध्येय बाळगावे, तरुणांनी नोकरीचे मागे न लागता व्यवसायाकडे वळावे तसेच देशाची व आपल्या आईवडिलांची सेवा करावी, बांबाची सर्वधर्म समभावाची शिकवण समाजामध्ये रुजवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी परिसरातील भाविकांसह ग्रामस्थ तसेच दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या ऐतिहासिक व पुरातन दर्गा पीर सरकार हजरत शहा शरीफ (रहे) दर्ग्याला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भेट देऊन दर्शन घेतले. अ‍ॅड. निकम हे अहमदनगरमध्ये सुरु असलेल्या कोपर्डी प्रकरणाच्या सुनावणीसाठी आले होते. दर्गा पीर सरकार हजरत शहा शरीफच्या ट्रस्टींनी ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार ककेला.

यावेळी अरकार एच. जहागागीरदार, पीर सरकार हजरत शहा शरीफ (रहे) दर्ग्याचे अध्यक्ष शेख मोहम्मद साबीर लाडमोहम्मद व विश्‍वस्त नोटरी पब्लीक शेख हाफिज एन. जहागीरदार यांनी त्यांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच गावकर्‍यांनी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना दीर्घ आयुष्य लाभो तसेच त्यांच्याकडून गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याची परमेश्‍वर शक्ती देवो, अशी प्रार्थना बाबांचे चरणी ईश्‍वराकडे करण्यात आली. याप्रसंगी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना भेटण्यासाठी दर्गादायरा व मुकुंदनगर परिसरातील लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती.

यावेळी पीर सरकार हजरत शहा शरीफ (रहे) दर्ग्याचे अध्यक्ष शेख मोहम्मद साबीर लाडमोहम्मद, विश्‍वस्त नोटरी शेख हाफिज एन. जहागीरदार, शेख निजाम शरीफमियॉ, सय्यद आतामिया पाशामिया, सय्यद साबीर दरवेशमियाँ यांनी त्यांचे स्वागत केले. दर्शनानंतर विश्‍वस्त शेख निजाम शरीफमियाँ यांनी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*