कारच्या सेफ्टी फीचर्समध्ये होणार बदल

प्रवाशांसाठीही एअरबॅग अनिवार्य
कारच्या सेफ्टी फीचर्समध्ये होणार बदल

नवी दिल्ली - New Delhi

भारतात विक्री होणाऱ्या सर्व कार्ससाठी, कार फीचर्सअंतर्गत ड्रायव्हिंग सीटसह, फ्रंट प्रवाशांसाठीही एअरबॅग अनिवार्य करण्याच्या दिशेने केंद्र सरकार तयारी करत आहे.

वाहनांच्या मानकांबाबतच्या सरकारच्या तांत्रिक समितीने नुकताच एक प्रस्ताव सादर केला आहे, या प्रस्तावात असं सांगण्यात आलं आहे की, सर्वात स्वस्तातील स्वस्त कारमध्येही, ड्युअल एअरबॅग्स अनिवार्य असाव्यात, जेणेकरून अपघात झाल्यास चालक आणि इतर प्रवाशांचे प्राण वाचण्यासाठी मदत होऊ शकेल.

भारतात रस्ते अपघातात दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. ओवर स्पीडिंग किंवा कारच्या धडकेत मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. कारमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी कार कंपन्या मागील काही वर्षांपासून कार सेफ्टी फीचर्सकडे विशेष लक्ष देत आहेत. तसंच ग्राहकांचाही कार खरेदी करताना, कारमधील सेफ्टी फीचर्सकडे कल वाढतो आहे.

भारतात विक्री होणाऱ्या सर्व कार्समध्ये ड्युअल एअरबॅग्स अनिवार्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. म्हणजेच ड्रायव्हिंग सीटसह, फ्रंट सीटवर बसलेल्या व्यक्तीसाठीही एअरबॅग अनिवार्य करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. एअरबॅग्स कोणत्याही कारच्या सर्वात प्रमुख सेफ्टी फीचर्सपैकी एक मानल्या जातात. परंतु याबाबत कार वापरकर्त्यांसह, कार निर्मात्यांमध्येही अतिशय उदासिनता होती. 1 जुलै 2019 पर्यंत कार चालवण्यासाठी एअरबॅग अनिवार्य नव्हते. परंतु त्यानंतर सरकारने सर्व कार्ससाठी एअरबॅग अनिवार्य केल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com