Gold : सोन्याची पुन्हा वाढली किंमत

गुंतवणूकदारांमध्ये वाढली चिंता
Gold
Gold

नवी दिल्ली - New Delhi

सोन्याच्या किंमतीत सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी वाढ झाली आहे. या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष फेडरल रिझर्व बैठकीकडे लागलं आहे. तसंच डॉलरमध्येही मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे.

अशा परिस्थितीत महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी फेडने घेतलेल्या निर्णयांमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. याच कारणामुळे सोमवारी अमेरिकेमध्ये स्पॉट सोन्याची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1,953.37 डॉलर झाली आहे. तर अमेरिकेच्या फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी वधारून ते 1,960.50 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

इतर चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये 0.1 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. खरंतर ही इतर देशांचे चलन असलेल्या गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

भारतात ही आहे सोने-चांदीची किंमत

मागील आठवड्यात दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये 207 रुपये प्रति 10 ग्राम इतकी वाढ झाली होती. त्यानंतर 10 ग्राम सोन्याचा भाव 52,672 रुपयांवर पोहोचला होता. तर चांदीच्या किंमतींमध्ये मागच्या आठवड्यात 251 रुपये प्रति किलो ग्राम वाढ झाली होती. ज्यानंतर चांदीचा नवा भाव 69,841 रुपयांवर पोहोचला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com