नवी दिल्ली - New Delhi

थंडीच्या दिवसांत पुन्हा एकदा अंड्याचे भाव वाढले आहेत. अंड्याचा भाव गेल्या 3 ते 4 वर्षातील रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत आहे. 20 डिसेंबर रोजी अंड्याच्या ओपन मार्केट रेटने मागील तीन वर्षातील ऑफिशियल रेटचा रेकॉर्ड तोडला आहे.

एका दिवसापूर्वी देशातील सर्वात मोठ्या बरवाला ओपन मार्केटमध्ये अंड्याची 550 रुपये प्रति शेकडापर्यंत विक्री झाली आहे. येत्या दिवसात हा रेट आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठ्या बरवाला बाजारपेठेत 100 अंड्यांचा अधिकृत भाव 420 रुपयांवरून 521 रुपयांवर पोहचला आहे. एक-दोन महिन्यात नाही, तर केवळ 24 तासात अंड्याचा भाव उच्चांकी स्तरावर पोहचला आहे.