या कंपनीचे भांडवली मूल्य झाले २ लाख कोटी डॉलर
उद्योग

या कंपनीचे भांडवली मूल्य झाले २ लाख कोटी डॉलर

एवढे भांडवल मूल्य असलेली अमेरिकेची पहिली कंपनी

Ramsing Pardeshi

वॉशिंग्टन - Washington

ॲपलचे भांडवली मूल्य केवळ दोन वर्षांत २ लाख कोटी डॉलर झाले आहे. एवढे भांडवल मूल्य असलेली ॲपल ही अमेरिकेची पहिली.....

कंपनी ठरली आहे. यापूर्वीच ॲपल ही जगात सर्वाधिक भांडवली मूल्य असलेली कंपनी ठरली आहे.

कोरोना महामारीत ॲपल कंपनीने चीनमधील आयफोन व रिटेल व्यवसाय बंद केला आहे. असे असले तरी कंपनीचे शेअर चालू वर्षात सुमारे ६० टक्क्यांनी वाढले आहेत.

ऍपल कंपनीचे ग्राहक खूप एकनिष्ठ असतात. ते सातत्याने आयफोनसह इतर उत्पादनांची विश्वासाने खरेदी करतात. कंपनीने एप्रिल-जूनच्या तिमाहीत चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. कंपनीने चार शेअरवर एक शेअर देवू केल्याने कंपनीच्या शेअरला गुंतवणूकदारांनी चांगली पसंती दर्शविली. त्यामुळे तीन आठवड्यांपासून ॲपलचे शेअरचे दर वधारले आहेत.

जगात काही थोड्याच कंपन्या लोकांच्या जीवनमान आणि शेअर बाजारावर मोठा परिणाम करतात. त्यामध्ये, अमेझॉन, फेसबुक, गुगलची पालक कंपनीसह ॲपलचा समावेश आहे. या कंपन्यांचा अमेरिकेच्या एस अँड पी ५०० मध्ये सूचीबद्ध असलेल्या एकूण कंपन्यांच्या भांडवली मूल्यात २३ टक्के हिस्सा आहे.

सौदी अरेम्को कंपनीचे भांडवली मूल्य डिसेंबर २०१९ मध्ये २ लाख कोटी डॉलर झाले होते. मात्र, खनिज तेलाच्या किंमती घसरल्यानंतर सौदीच्या कंपनीच्या शेअर दरामध्ये घसरण झाली आहे. सध्या सौदी अरेम्कोचे भांडवली मूल्य हे १.८२ लाख कोटी डॉलर आहे. ॲपल कंपनीचे दोन वर्षांपूर्वी भांडवली मूल्य हे पहिल्यांदा १ लाख कोटी डॉलर झाले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com