Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedभारतात सर्वाधिक विक्री झालेली कार

भारतात सर्वाधिक विक्री झालेली कार

नवी दिल्ली – New Delhi

मारुती सुझुकीच्या कार्स अनेक ग्राहकांची पहिली पसंती ठरली आहे. आजही मारुती सुझुकी कार्सची क्रेझ कायम असून भारतातील सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे.

- Advertisement -

डायनेमिक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मारुती सुझुकी स्विफ्ट मध्ये सर्वाधिक विक्री झालेले मॉडेल ठरलं आहे.मारूती सुझुकीने जून 2020 ते नोव्हेंबर 2020 या काळात दर महिन्याला मारुती सुझुकी स्विफ्ट मॉडेलच्या तब्बल 15, 798 वाहनांची विक्री केली आहे.

गेल्या 6 महिन्यांत सर्वाधिक विक्री झालेल्या 10 पैकी 7 गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. मारूतीच्या 4 टॉप मॉडेलची सर्वाधिक विक्री झाली आहे. त्यापैकी पहिल्या क्रमांकावर स्विफ्ट आहे. तर सर्वाधिक विक्री झालेल्या दुसऱ्या क्रमांकावर वॅगनआर कार आहे. या कारच्या सरासरी 14,466 वाहनांची महिन्याला विक्री झाली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर अल्टो 800 चा नंबर लागतो. अल्टोच्या 12,461 गाड्यांची विक्री झाली आहे. तर 14,316 युनिट्सच्या विक्रीसह बलेनो गाडी सर्वाधिक विक्री झालेल्या कार्समध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या