निकृष्ट दर्जाच्या खेळण्यांना लागणार चाप !

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली – New Delhi

विदेशामधून देशात आयात होणार्‍या खेळण्यांना गुणवत्तेचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. हा नवीन नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले असून या निर्णयात…

देशात आयात होणार्‍या 372 उत्पादनांसाठी गुणवत्तेचे मानके तयार करण्याची प्रक्रिया केंद्र सरकार करत आहे. यामध्ये स्टील, रसायने, औषधे, इलेक्ट्रिक मशिनरी ते फर्निचर अशा उत्पादनांचा समावेश आहे. त्यामध्ये चीनमधून आयात होणार्‍या कमी दर्जाच्या व अत्यावश्यक नसलेल्या उत्पादनांचाही समावेश आहे.

रामविलास पासवान म्हणाले, की देशात आयात होणार्‍या खेळण्यांसाठी 1 सप्टेंबरपासून गुणवत्ता नियंत्रण मानके (क्यूसीएस) बंधनकारक असणार आहेत. या प्रक्रियेत बीआयएसचे अधिकारी मुख्य जहाज बंदरावर नियुक्त केले जाणार आहेत. हे अधिकारी उत्पादनाचे नमुने घेवून चाचणी करणार आहेत. याशिवाय रसायने, इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि अवजड मशीन, पॅकिंगमधील पाणी, अन्न यांची गुणवत्ता तपासण्याची मानके निकष करण्याचे काम सुरू आहे.

दोन टप्प्यात होणार चाचणी

बीआएसचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी म्हणाले, की उत्पादनांसाठी गुणवत्तेचे निकष हे संबंधित मंत्रालयाकडून निश्चित करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ सोन्यासाठीचे मानके हे जून 2021 पासून लागू होणार आहेत. देशात विविध उत्पादनांसाठी 268 मानके आहेत. त्यामध्ये आणखी भर पडणार असल्याचेही तिवारी यांनी सांगितले. उत्पादनांची तपासणी दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात बीआयएसचे अधिकारी ज्या कारखान्यातून उत्पादने देशात आय होतात, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून पाहणी करणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात देशातील जहाज बंदरावर उत्पादने आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. उत्पादनांची गुणवत्ता निश्चित करणारी ब्युरो ऑॅफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस) ही केंद्र सरकारची मुख्य संस्था आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *