मुंबई - Mumbai

आपल्या पैकी अनेकांना असे वाटते कि आपल्याकडे देखील चारचाकी किंवा दुचाकी असावी. पण त्या गाडीचा नंबर आपल्या पसंतीचा असावा. त्यासाठी अनेकजण कितीही पैसे मोजण्यासाठी तयार असतात. काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला एक गड्याने गाडीच्या किंमतीपेक्षा जास्त पैसे चॉईस नंबरसाठी मोजल्याची बातमी दिली होती.

पण आता चॉईस नंबरसाठी चढाओढ करणार्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण यापुढे तुम्हाला चॉईस नंबरसाठी तुम्हाला दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.

याबाबतची महत्वपूर्ण घोषणा राज्याच्या गृह विभागाकडून करण्यात आली आहे. कुठल्याही वाहनाच्या चॉईस नंबरसाठी आकारण्यात येणार्या शुल्कात भरघोस वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम पाच हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत असणार आहे. ‘चॉईस’ नंबरसाठी मोठी स्पर्धा असल्यामुळे राज्य सरकारला यामधून कोटावधी रुपयांचा महसूल मिळत असतो.

राज्याच्या गृह विभागाकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार दुचाकीसाठी 0001 हा क्रमांक हवा असल्यास आता एक लाख व फोर व्हीलरसाठी 5 लाख रुपये मोजावे लागणार आहे. या घडीला जो दुचाकीसाठी 50 हजार रुपये व चारचाकीसाठी 4 लाख रुपये होता.

परंतू, राज्याच्या गृह विभागाकडून याबाबतची अधिसूचना काढण्यात आलेली असली तरी त्यावर नागरिकांच्या सूचना-हरकती मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून या हरकती व विचार करून नव्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.