मुकेश अंबानी सलग नवव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय

संपत्ती आहे तब्बल...
मुकेश अंबानी सलग नवव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय

नवी दिल्ली - New Delhi

रिलायन्स इंडस्ट्रीज ही आयआयएफएल वेल्थ हरुण इंडियाच्या यादीत सर्वाधिक मूल्य असलेली भारतीय कंपनी ठरली आहे. सलग नवव्या वर्षात सर्वाधिक मूल्य असल्याचा अव्वल क्रमांक मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्सने टिकविला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे एकूण 6.58 लाख कोटी रुपये संपत्ती आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती ही गेल्या 12 महिन्यांत 73 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे मुकेश अंबानी ही आशियातील प्रथम तर जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ’हरुण भारतीय सर्वाधिक श्रीमंत यादी 2020’मध्ये 1 हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेले 828हून अधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.

लंडनस्थित हिंदुजा ब्रदर्स यांची एकत्रित संपत्ती ही 1.43 लाख कोटी रुपये आहे. हे देशातील श्रीमंताच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. एचसीएलचे संस्थापक शिव नडार यांची संपत्ती 1.41 लाख कोटी रुपये आहे. त्यांचा यादीत तिसरा क्रमांक आहे. त्यानंतर गौतम अदाना आणि कुटुंबाचा चौथा क्रमाक आहे. अझीम प्रेमजी यांचा पाचवा तर अॅव्हेन्यू सुपरमार्टचे संस्थापक राधाकृष्णन दमानी यांचा सहावा क्रमांक आहे.

नव संपत्ती निर्माण करणार्‍यांमध्ये इनोव्हटिव्ह स्टार्ट अप व मजबूत व्यावसायिक व्यस्थापन असलेले कौटुंबिक उद्योग, गुंतवणूकदार ज्यांच्याविषयी विश्वास ठेवतात अशांचा समावेश आहे. ज्यांच्याकडे 1 हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे, असे देशात 2 हजार वैयक्तिक असल्याचे हरुण इंडियाचे मुख्य संशोधक आणि व्यवस्थापकीय संचालक अनस रहेमान जुनैद यांनी सांगितले.

ग्रॅन्युल्स इंडियाचे चिगरुपती कृष्णा प्रसाद यांची संपत्ती 218 टक्क्यांनी वाढून 3 हजार 500 कोटी रुपये झाली आहे. ओयो रुम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांची संपत्ती 4 हजार 500 कोटी रुपये आहे. अग्रवाल हे सर्वाधिक तरुण अब्जाधीश आहेत.

गोदरेज कंपनीच्या स्मिता व्ही कृष्णा या सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती एकूण 32 हजार 400 कोटी रुपये आहे. त्यांच्यानंतर बिकॉनच्या संस्थापक किरण मुझुमदार-शॉ यांचा क्रमांक आहे. त्यांची एकूण संपत्ती 31 हजार 600 कोटी रुपये आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com