Friday, April 26, 2024
HomeUncategorizedखेळण्यांवर ‘आयएसआय’ मार्क बंधनकारक

खेळण्यांवर ‘आयएसआय’ मार्क बंधनकारक

मुंबई – Mumbai

पालकांनो जरा इडके लक्ष द्या. तुम्ही आपल्या लहान मुलांना खेळणी घेताना खबरदारी घेतली पाहिजे. अन्यथा तुमच्या मुलांना आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो. खेळणी गुणवत्ता नियंत्रणात सार्वजनिक आरोग्याचाही विचार करण्यात आला आहे. त्यानुसार हा निर्णय करण्यात आला आहे. खेळण्यांवर ‘आयएसआय’ मार्क बंधनकारकच करण्यात आले आहे.

- Advertisement -

14 वर्षांखालील लहान मुलांच्या खेळण्यांवर आयएसआय मार्क बंधनकारकअसणार आहे. केंद्र सरकारने याबाबत जारी केलेल्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या खेळणी गुणवत्ता नियंत्रणात सार्वजनिक आरोग्याचाही विचार करण्यात आलाय, असं सांगत न्या. नितीन जामदार आणि न्या. मिलिंद पाटील यांनी केंद्र सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

केंद्राच्या आदेशानुसार, भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयसी) आयएसआयने भारतात वापरात येणारी सर्व खेळणी चिन्हांकित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. युनायटेड टॉयज असोसिएशनने केंद्राच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या