जगातली सर्वात महाग हॅण्डबॅग पाहिलीत का?

पर्सच्या किंमतीमध्ये अनेक महागड्या गाड्या किंवा अलिशान बंगले येतील पण...
जगातली सर्वात महाग हॅण्डबॅग पाहिलीत का?

मुंबई - Mumbai

खास डिझाइन केलेल्या या पर्सची किंमत ऐकून भल्याभल्यांना घाम फुटू शकतो. या एका पर्सच्या किंमतीमध्ये अनेक महागड्या गाड्या किंवा अलिशान बंगले येतील पण ही पर्स पाहिली तर यावर केलेलं नक्षीकाम आणि त्याचं मटेरियल याची किंमत अफाट आहे.

काही दिवसांपूर्वी खास डोळ्यांसाठी एका कबुतराचा लिलाव करण्यात होता. त्यानंतर आता एक पर्स चर्चेचा विषय बनली आहे.

पर्स म्हटलं आणि त्यातही महाग म्हटलं तरी लाख दोन लाख किंवा 5 लाख असेल असा अंदाज साधारण असतो पण जगातली सर्वात महाग पर्स तयार करण्यात आली आहे.

मात्र याची किंमत आहे 52 कोटी रुपये. ही किंमत ऐकून थक्क व्हायला होता. एका हॅण्डबॅगसारख्या पर्सची किंमत 52 कोटी बापरे! पण खरंच अशी पर्स तयार करण्यात आली आहे. या पर्सची जगभरात तुफान चर्चा देखील होत आहे. इटालियन लग्झरी ब्रॅन्डच्या कंपनीने खास नक्षीकाम करत ही पर्स तयार केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com