Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedGold Price सोने - चांदी दरात घसरण

Gold Price सोने – चांदी दरात घसरण

नवी दिल्ली – New Delhi

सोन्याच्या दरात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण झाली. सकाळी 10 च्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्यात 522 रुपयांची घसरण झाली होती. यासह 10 ग्रॅम सोन्याचे दर 50 हजार 048 रुपये आहेत. तर चांदीमध्येही 708 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. यासह प्रति किलो चांदीचे दर 60 हजार 437 झाले आहेत.

- Advertisement -

सोने-चांदीच्या दरात आणखी घट पाहायला मिळू शकते असं तज्ज्ञांचे मत आहे. सोनं 48 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत उतरू शकते. तर, दिवळी सणापर्यंत सोने दरात वाढ झालेली पाहायला मिळू शकते. डिसेंबरच्या अखेरीस सोन्यांचे दर उच्चांक गाठू शकतात.

सध्या स्पॉट गोल्डच्या किंमती चांगल्या दिसत आहे. सध्या स्पॉट गोल्ड $1,840 प्रति औंस आहे. तर, येत्या काही दिवसांत एमसीएक्सवर सोनं 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत उतरू शकते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी येणारा कालावधी चांगला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दिवाळीपर्यंत सोनं गाठवणार उच्चांक

सोन्याचे जागतिक बाजारातही दर उतरत असले तरी येत्या काही महिन्यात सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ होऊ शकते. मुख्यत: दिवाळीत सोन्याचे दर 52 हजार 500 ते 53 हजारपर्यंत जाऊ शकतात. तर एमसीएक्स हे दर 55 हजार आणि रिटेल बुलियनमध्ये 57 हजारापर्यंत जाऊ शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या