सोने ४०० रूपयांनी वधारले
उद्योग

सोने ४०० रूपयांनी वधारले

चांदीमध्येही तेजीची लाट

Rajendra Patil

मुंबई -

आज सराफा बाजारात सोने ४०० रुपयांनी वधारले आहे. सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४९१०० रुपये झाला आहे. चांदीमध्ये तेजीची लाट असून आज चांदीचा भाव प्रती किलो ५२०२० रुपये झाला. त्यात १२० रुपयांची वाढ झाली आहे.

कोव्हिड-१९ (करोना) विषाणूचा वाढणारा संसर्ग, देशात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार की काय? अशी चर्चा सुरू असताना, अर्थव्यवस्थेत आधीच असलेली मंदी आणि त्यात करोना संकटाची पडलेली भर याची चिंता सर्वांनाच वाटत आहे. विविध वित्तसंस्थांनाही सोने व चांदी या मौल्यवान धातूंची खरेदी करण्याचा सपाटा लावल्याने त्याचा परिणाम म्हणून सोन्याने उच्चांकी भावाची नोंद केली.

Deshdoot
www.deshdoot.com