Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापुन्हा वाढली सोन्याची किंमत

पुन्हा वाढली सोन्याची किंमत

नवी दिल्ली – New Delhi

अमेरिकन डॉलरची किंमत घसरल्यामुळे सोमवारी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या कमकुवत आर्थिक आकड्यांमुळे आणि कोरोना महामारीमुळे सुरु असलेल्या मंदीमुळे गेल्या आठवड्याच्या शेवटी जागतिक आर्थिक सुधारणेबद्दल भीती व्यक्त करण्यात आली होती. ज्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परदेशी बाजारात…

- Advertisement -

सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी वधारला आणि तो प्रति औंस 1,935.53 डॉलर पोहोचला आहे. देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचं झालं तर देशी वायदा बाजारावर म्हणजेच MCX वरही आज सकाळी सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला आहे. MCX वर सोन्याचा भाव 107 रुपयांनी वाढून म्हणजेच 0.21 टक्क्यांनी वाढून 50785 रुपयांवर आला आहे तर चांदीदेखील 872 रुपयांनी वाढून 68138 रुपयांवर बंद झाली.

दिल्ली बुलियन मार्केटमधील 10 ग्रॅम सोन्याची किंमत शुक्रवारी प्रति दहा ग्रॅम 52 हजार रुपयांवर आली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात प्रतिकिलो 700 रुपयांची मोठी घसरण आली होती. शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील 99.9 टक्के सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 51,826 रुपयांवरून घसरून 51,770 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली होती. यावेळी दर दहा ग्रॅममागे 56 रुपयांनी घट झाली होती.

सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीतही मोठी घट दिसून आली आहे. शुक्रवारी एक किलो चांदीची किंमत दहा ग्रॅम 69,109 रुपयांवरून घसरून 68,371 रुपये झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या