Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासोने चकाकले; @50000

सोने चकाकले; @50000

जळगाव । प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याने उच्चांक गाठल्यानंतर सोन्याचे दर एका तोळ्याला 49 हजार 200 रुपयांपर्यंत गेले आहे. लॉकडाऊनच्या काळात सोन्याच्या दरातील ही विक्रमी वाढ आहे. कोरोनाच्या संकटाने जगभरातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला असतांना अनलॉकडाऊन केल्यामुळे हळूहळू परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. मात्र या अनिश्चिततेच्या काळात सोन्यातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

- Advertisement -

गुंतवणुकीकडे अधिक लक्ष

लॉकडाऊनच्या काळात सर्व दुकाने बंद असतांनादेखील सोन्याच्या भावात चढ-उतार सुरुच होता. भाव वाढीला तुर्त मोठे कारण कोणतेही नसलेतरी सोन्यात गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणात वाढल्याने भाव वाढीची घोडदौड सुरुच आहे. जळगावच्या बाजारात बुधवारी सोन्याचे दर 50 हजार रुपये होते. तर गुरुवारी या दरात 800 रुपयाने घट झाल्याने सोन्याचे दर 49 हजार रुपये 200 इतके स्थिरावले होेते. दरम्यान गुंतवणूकीच्या दृष्टीने सोने खरेदी करणार्‍यांची संख्या अद्यापही चांगलीच आहे.

– मनोहर पाटील,पीआरओ, आर.सी.बाफना ज्वेलर्स

दरात चढ-उतार सुरुच

गेल्या एक वर्षाच्या काळात सोन्याचे दर तब्बल 15 हजार रुपयांनी वाढले आहे. त्यापैकी 10 हजार रुपयांची वाढ यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून झाली आहे. बुधवारी 50 हजार रुपये असलेले सोन्याचे दर गुरुवारी 49,200 रुपये झाले होते. आंतराराष्ट्रीय बाजारपेठेवर कोरोनाचा झालेला परिणाम जगभर असलेली मंदी आणि गुंतणवूकदारांची सोन्याकडे बघण्याची विश्वासार्हता यामुळे सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढत्या दराबरोबर सोने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.

– भागवत भंगाळे, संचालक, भंगाळे ज्वेलर्स

- Advertisment -

ताज्या बातम्या