नवी दिल्ली - New Delhi

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. एसबीआयने फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे.

एसबीआयने 2 कोटींपेक्षा कमी असणाऱ्या रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिटवर 1-2 वर्षाकरता असणारे व्याज 0.20 टक्क्यांनी कमी केले आहे. आता एसबीआयच्या एफडीवर मिळणारा फायदा कमी झाला आहे. नवीन व्याजदर 10 सप्टेंबर 2020 पासून लागू झाली आहेत.

10 सप्टेंबरपासून लागू होतील नवे व्याजदर

7 ते 45 दिवस - 2.90 टक्के

-46 ते 179 दिवस - 3.90 टक्के

-180 ते 210 दिवस - 4.40 टक्के

-211 दिवस ते 1 वर्ष - 4.40 टक्के

-1 ते 2 वर्ष - 4.90 टक्के

-2 ते 3 वर्ष - 5.10 टक्के

-3 ते 5 वर्ष - 5.30 टक्के

-5 ते 10 वर्ष - 5.40 टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन एफडी दर

-7 ते 45 दिवस - 3.40 टक्के

-46 ते 179 दिवस - 4.40 टक्के

-180 ते 210 दिवस - 4.90 टक्के

-211 दिवस ते 1 वर्ष - 4.90 टक्के

-1 ते 2 वर्ष - 5.40 टक्के

-2 ते 3 वर्ष - 5.60 टक्के

-3 ते 5 वर्ष - 5.80 टक्के

-5 ते 10 वर्ष - 6.20 टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एफडी प्रोजेक्ट

त्याचप्रमाणे बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक एफडी प्रोजेक्ट 'एसबीआय वीकेअर डिपॉझिट' लाँच केले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या रिटेल टर्म डिपॉझिटवर 30 बेसिस पॉईंट्सचा अतिरिक्त प्रीमियम मिळेल. एसबीआय वीकेअर योजना 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू आहे.