मुंबई - Mumbai

covid-19 मुळे संपूर्ण जगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी बचतीचा मार्ग अवलंबला आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग टालण्यासाठी व लॉकडाऊनवर उपाय म्हणून ऑनलाइन खरेदीमध्ये देखील भारतीयांनी आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे कॅशलेस व्यवहारातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जगभरातील विविध बाजारांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार लॉकडाऊनमध्ये सवलती मिळाल्यानंतर 74 टक्के भारतीय ऑनलाइन खरेदीबाबत सकारात्मक आहेत. जगभरात हे प्रमाण 64 टक्के आहे.

जगभरातील 12 बाजारपेठांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं त्यात असं लक्षात आलं की लॉकडाउनच्या काळातही भारतीय ऑनलाइन खरेदीत आघाडीवर आहेत. हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, केनिया, चीन, मलेशिया, पाकिस्तान, सिंगापूर, तैवान, यूएई, ब्रिटन आणि अमेरिका या बाजारपेठांमध्ये हा अभ्यास करण्यात आला.