Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअवघ्या ४८ तासात २०९ उद्योग झाले कोट्यधीश !

अवघ्या ४८ तासात २०९ उद्योग झाले कोट्यधीश !

बंगळुरू – Bangalore

कोरोना महामारीत मंदीसदृश्य स्थिती असतानाही ॲमेझॉनने ’प्राईम डे’च्या ऑॅनलाईन विक्रीत धमाकेदार यश मिळविले आहे. या विक्रीत २०९ लघू व मध्यम उद्योग हे ४८ तासांत कोट्याधीश झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

- Advertisement -

ॲमेझॉनने ६ ऑॅगस्टच्या मध्यरात्रीपासून ’प्राईम डे’ या सवलतीच्या योजनेची सुरुवात केली. त्यामध्ये श्रेणी-२ आणि श्रेणी-३ मधील शहरांतून ६२ हजार विक्रेत्यांनी संपूर्ण देशातून विक्रीसाठी सहभाग घेतला. दोन दिवसांच्या सवलतीच्या योजनेत देशातील ९१ हजार लघू आणि मध्यम उद्योगांनी सहभाग घेतला.

३१ हजार लघू आणि मध्यम उद्योगांनी आजवरची सर्वाधिक विक्री केली आहे. तर ४ हजार लघू आणि मध्यम उद्योगांनी केवळ ४८ तासामध्येच १० लाख व त्याहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे.

सुमारे १ लाख लघू आणि मध्यम उद्योगांना ऑॅर्डर –

ॲमेझॉन इंडियाचे भारतीय उपाध्यश्र अमित अगˆवाल म्हणाले, की ’प्राईम डे’ हा लघू व मध्यम भागीदारांसाठी विक्रीसाठी खास उपलब्ध केला होता. त्यांच्याकडून कायम विक्री वाढविण्यासाठी ॲमेझॉनकडे पाहिले जाते. हा लघू उद्योगांसाठी सर्वात मोठा ’प्राईम डे’ राहिला आहे. त्यामध्ये सुमारे १ लाख लघू आणि मध्यम उद्योगांना ऑॅर्डर मिळाल्या आहेत. तसेच कारागीर, महिला आणि लॉंचपॅड आंत्रेप्रेन्युअर यांनीही पहिल्या दिवशीपासून आजवरची सर्वात मोठी विक्री केली आहे.

अलेक्साने दिली १० लाखांहून अधिक प्रश्‍नांची उत्तरे-

गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्राईमचे सदस्यत्व घेणार्‍यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. तर नवीन सदस्यांपैकी ६५ टक्के सदस्य हे प्रमुख १० महानगरांव्यतिरिक्त शहरामधील आहेत. प्राईम डेला ऑॅनलाईन सहायक अलेक्साने ग्राहकांच्या १० लाखांहून अधिक प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत. अलेक्साने ग्राहकांना उत्पादनांची खरेदी, चांगल्या डील, नवीन लॉंचिंग आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन केले. कंपनीने ११ ऑॅगस्टपर्यंत ’फ्रिडम डे’ ही खरेदी सवलतीची योजना शुक्रवारी जाहीर केली आहे. यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप आदी वस्तुंच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी सवलत देण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या