ॲमेझॉनचा ’प्राईम डे’ला धुमधडाका
उद्योग

ॲमेझॉनचा ’प्राईम डे’ला धुमधडाका

एक हजार नवीन उत्पादने करणार लॉंच

Ramsing Pardeshi

बंगळुरू - Bangalore

ॲमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीकडून १०० लहान आणि मध्यम उद्योग आणि स्टार्ट अपला उत्पादनांच्या विक्रीसाठी मोठे माध्यम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ॲमेझॉनचा ’प्राईम डे’लामेझॉनचा ’प्राईम डे’ ६ ते ७ ऑॅगस्टला असताना याचदिवशी १ हजारांहून अधिक उत्पादने लॉंच करण्यात येणार आहेत.

स्टार्ट अप आणि लघू व्यवसायांसाठी ॲमेझॉनने लॉंचिग कार्यक्रम आखला आहे. यामधून १७ श्रेणीमधील विविध उत्पादनांचे लॉंचिंग करण्यात येणार आहेत. यामध्ये आरोग्य व वैयक्तिक देखभाल, सौंदर्य, किराणा आणि घरगुती उत्पादनांचा समावेश आहे.

’प्राईम डे’ला कारागिरांकडून ’कारागीर’ तर महिला नवउद्योजकांकडून ’सहेली’मधून सवलतीच्या खरेदीच्या योजना जाहीर करण्यात येणार आहेत. यामध्ये आदिवासी महिलांकडून तयार करण्यात आलेल्या हस्तकला उत्पादनांचा समावेश आहे. ’कारागीर’मधून २७० हस्तकला उत्पादने देशातील विविध कारागीर विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत. विविध सरकारी संस्थांची उत्पादनेही विक्रीला ठेवण्यात येणार आहे. यामध्ये आंधˆप्रदेशमधील अपको हातमाग आणि मध्य प्रदेशमधील मृगनयनी आदींचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com