Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

प्रत्येक शेतकर्‍याला वर्षाला 10 हजार रुपये

Share

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे : जिल्ह्याचा पाणीप्रश्न दूर करणार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- युती शासनाच्या पाच वर्षाच्या काळात समाधानकारक कामे झालेली आहे. ज्या ठिकाणी आम्हाला पटलं नाही, त्या ठिकाणी आम्ही त्यांना बोललो. चुकीच्या ठिकाणी चुका दाखवल्या. काही प्रमाणात शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली, परंतू येणार्‍या काळात शेतकर्‍यांना कर्जमुक्त करून त्यांच्या खात्यावर प्रत्येक वर्षाला किमान 10 हजार रुपये मिळतील, अशी योजना आम्ही तयार केली असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

महायुतीचे प्रचारार्थ येथील थत्ते मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, माजी आ. भानुदास मुरकुटे, उमेदवार भाऊसाहेब कांबळे, माजी आ. चंद्रशेखर कदम, खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, डॉ. चेतन लोखंडे, भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजाभाऊ झावरे, जिल्हा संघटक डॉ. महेश क्षिरसागर, शहरप्रमुख सचीन बडदे, अशोक थोरे, योगेश बोरुडे, सभापती दिपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, जि.प. सदस्य शरद नवले, संगिताताई गांगुर्डे, नगरसेवक अंजुम शेख, राजेश अलघ, रविंद्र गुलाटी, आप्पासाहेब गांगड, श्यामलिंग शिंदे, सिध्दार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, किरण लुणिया, एकलव्य संघटनेचे शिवाजी ढवळे, अक्षय वर्पे, नगरसेवक दिपक चव्हाण, वैशाली चव्हाण, जितेंद्र छाजेड, सोपान राऊत, प्रा. सुनिता गायकवाड, दादासाहेब कोकणे, आदी मान्यवर उपस्थित होते. धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा जिल्हाध्यक्ष विठ्ठल राऊत यांनी सत्कार केला. यावेळी जनाबाई रामचंद्र तुपे या महिलेच्या हस्ते नारळ फोडून कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, युती सरकार आल्यानंतर श्रीरामपूर बरोबर जिल्ह्याचा पाणीप्रश्न आपण दूर करणार आहोत. शिवसेना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. आमचा भगवा कोणावरती अन्याय करण्यासाठी नसून अन्याय दूर करणारा आहे, हीच सेनाप्रमुखांची आम्हाला शिकवण आहे. ना. विखे पाटील म्हणाले की, सध्या श्रीरामपूरची वाताहत झाली आहे. औद्योगिक क्षेत्रा बरोबर पाटपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. येथील औद्योगिक क्षेत्राचा विकास केल्यास येथील मतदार तुम्हाला कधीही सोडणार नाही, मागील निवडणुकीत कांबळे यांनी चूक केली होती, ती त्यांच्याकडून पुन्हा होणार नाही. माजी आ. मुरकुटे म्हणाले की, कांबळे यांना शिवसेनेमध्ये जाण्याचा सल्ला मीच दिला. त्यामुळे एका बॉलमध्ये 21 विकेट घेणारा तालुक्यात मी एकमेव आहे. यासाठी शहरप्रमुख सचिन बडदे यांचे सहकार्य लाभले. ना. विखे व आमची मैत्री केव्हाही जुळते व कधीही तुटते, असेही मुरकुटे शेवटी म्हणाले.

माझे ऐकले तर त्यांचा फायदाच
लोकसभेच्यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी माझे ऐकले नाही, त्यावेळी माझे ऐकले असते तर फायदाच झाला असता. ज्या-ज्या वेळी त्यांनी माझा सल्ला ऐकला त्या-त्या वेळी त्यांचा फायदा झाला असल्याचे ना. राधाकृष्ण विखे यावेळी म्हणाले.

दोन दिवसांत आणखी चमत्कार !
येथील नगरसेवक अंजुम शेख गटाने कांबळे यांना पाठिंबा दिला ते सर्व एका मंचावर आले. आणखी चार ते पाच दिवसांमध्ये श्रीरामपूर शहरात आणखी चमत्कार पाहायला मिळतील, असे सूचक विधान ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. त्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!